Belagavi

बारामतीत कर्नाटकाच्या बसला फासले काळे

Share

महाराष्ट्रातील बारामती बसस्थानकामध्ये कर्नाटकाच्या बसला काळे फासून जोरदार घोषणाबाजी केली . मात्र तिथल्या पोलिसांनी आंदोलकांनी बसवर फासलेले काळे पेट्रोल पुसून बस कर्नाटकात हलियाळ कडे सुरक्षित रित्या परत पाठवली .

मंगळवारी , महाराष्ट्रातील बारामती बस स्थानकावर हलियाळ ते बारामती असा प्रवास करणारी बस प्रवाशांना घेऊन रात्री सात वाजता पोचली होती . त्यावेळी 10 ते 12 जणांच्या गटाने ,येऊन , बसला काळे फासले आणि घोषणाबाजी केली . यावेळी त्या ठिकाणी तातडीने हजर झालेल्या पोलिसांनी या बसेसवर फासलेले काळे पेट्रोल ने पुसून काढले आणि बस मधील ड्रायव्हर कंडक्टरसह प्रवाशांना सुखरूप पाठवून दिले .

यासंबंधी कर्नाटक बसच्या ड्रायव्हरने माध्यमांना माहिती दिली. त्याचप्रमाणे या हलियाळ बारामती बस च्या कंडक्टरने सांगितले कि काल आम्ही हलियाळहुन प्रवासी घेऊन बारामतीला संध्याकाळी 7 वाजता पोचलो . त्यावेळी अचानक जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत काही जण आले आणि त्यांनी आमच्या गाडीला काळे फासले . पोलिसांनी बसेसवरील काळे पुसून काढले आणि आम्हाला परत पाठवले. यासंदर्भात परिवहन अधिकाऱ्यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले कि सध्याची परिस्थिती पाहता , प्रवासी आणि बसेसच्या सुरक्षेच्या दृष्टीने कर्नाटकातून महाराष्ट्रात बस वाहतूक चालू ठेवायची कि नाही यासंबंधी चर्चा करीत आहोत .

एकंदरीत , सीमावादाचे आणि करवे आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले आहेत . काल करवे कार्यकर्त्यांनी , महाराष्ट्र परवानाधारक वाहनांवर दगडफेक करून काळे फासले होते . त्याचेच प्रत्युत्तर म्हणून कर्नाटकच्या बसला बारामतीत काळे फासण्यात आले . ह्या गोष्टी दोन्ही राज्यातून वारंवार घडत आहेत . मात्र यामध्ये नुकसान तर होत अशेच , वाहनचालक आणि प्रवाशांना वेठीस धरले जात आहे .

Tags: