नुकत्याच बेळगावमधील गोगटे कॉमर्स कॉलेज मध्ये झालेल्या लाल पिवळ्या ध्वजावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटात झालेल्या मारहाणीसंदर्भात , संपतकुमार या विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेला गुन्हा , तसेच पोलिसांकडून करण्यात आलेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त करून , संपतकुमारच्या रक्षणार्थ आज आज लिंगायत संघटनाच्या संघाने , दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करण्याच्या मागणीस्तव , आज शहर पोलीस आयुक्ताना निवेदन दिले.
मंगळवारी जागतिक लिंगायत महासभा , लिंगायत संघटना , त्याचप्रमाणे , अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभा आदी संघटनेच्या नेतृत्वाखाली , एकत्रितपणे हे निवेदन देण्यात आले.गोगटे कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात कन्नड ध्वज घेऊन नाचल्याप्रकरणी , एका दलित विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली होती . मारहाण करणाऱ्या संपतकुमार याच्यावर , पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला मारहाण केली होती . रक्षणकर्त्या पोलिसांनीच , संपत कुमारवर गुन्हा दाखल करून मारहाण केल्याच्या निषेधार्थ , आज कन्नड संघटनांच्या संघाने दोषी पोलीस अधिकाऱ्याना यासंबंधी ताकीद देऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शहर पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे केली.

यासंदर्भात रत्नप्रभा बेल्लद यांनी माहिती देताना सांगितले कि , पोलिसांनी संपतकुमार याला मारहाण केली हा प्रकार निंदनीय आहे . अशा दोषी पोलिसांवर कारवाई व्हायला हवी . वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अशा पोलीस अधिकाऱ्यांना समज द्यायला हवी . या प्रकरणी संपतकुमारला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष सुजित मुळगुंद म्हणाले कि , कायद्याचे रक्षकच भक्षक बनले आहेत . गोगटे कॉलेज मधील विद्यार्थ्यांच्या मारहाणीच्या प्रकरणात , संपतकुमार या विद्यार्थ्यांवर कन्नड ध्वजाचा अपमान केल्याचे प्रकरण दाखल करून , त्याचे घर पेटवून देऊ अशी धमकी दिली आहे . संपतकुमार याला पोलीस अधिकाऱ्यांनी मारहाण देखील केली आहे . अशा या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करून त्यांची बेळगावाबाहेर बदली करावी अशी मागणी केली.
यावेळी इरण्णा दयन्नावर , शंकर गुडस तसेच विविध लिंगायत संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते .


Recent Comments