महाराष्ट्राचे मंत्री बेळगावात येण्याच्या मुद्द्यावरून बेळगावचे वातावरण तापत चालले आहे . अनेक कन्नड संघटना आंदोलने करीत आहेत . महाराष्ट्राच्या मंत्र्यांच्या बेळगाव भेटीसंबंधी जिल्हाधिकारी नितीश पाटील यांनी बेळगावमध्ये कोणती सुरक्षतेची पावले उचलली गेली आहेत याबद्दल माहिती दिली .
महाराष्ट्राचे सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील हे 3 तारखेला बेळगावला येणार होते . परंतु त्यांना येण्यासाठी इथली परिस्थिती योग्य नाही . त्यामुळे तुम्ही येऊ नये असे कर्नाटकाच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे . तरीही ते इथे आले तर इथली कायदा आणि सुव्यस्था बिघडेल . शिवाय त्यांच्याही सुरक्षतेचा प्रश्न आहे .
त्यामुळे ते आपला दौरा रद्द करतील अशी अपेक्षा आहे . अन्यथा आम्ही प्रतिबंधात्मक आदेश लागू करू . बेळगाव जिल्हा प्रशासन कलम 143 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याच्या तयारीत आहे . त्याचप्रमाणे , सीमेवर एसपींच्या नेतृत्वाखाली आम्ही कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे . अशी माहिती जिल्हाधिकारी नितीश कुमार यांनी दिली .


Recent Comments