Belagavi

नागनूर रुद्राक्षी मठात षडस्थल ध्वजारोहण कार्यक्रम

Share

बेळगावातील नागनूर रुद्राक्षी मठाचे कर्मयोगी शतायुषी पूज्य डॉ. शिवबसव महास्वामीजींच्या 133व्या जयंती महोत्सवानिमित्त आज मठाच्या आवारात षडस्थल ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला.

गदग डंबळ तोंटदार्य मठाचे डॉ. सिद्धराम महास्वामी यांच्या सानिध्यात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागनूर रुद्राक्षी मठाचे डॉ. अल्लम प्रभू होते. अरभावी पुण्यक्षेत्राचे श्री दुरदुंडेश्वर मठाचे पूज्य डॉ. सिद्धलिंग महास्वामी यांच्या हस्ते षडस्थल ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी बोलताना स्वामीजींनी रुद्राक्षी मठातील भक्तांनी जयंती उत्सवाचे शिस्तबद्ध आयोजन केल्याबद्दल प्रशंसा केली. यावेळी भक्तांनी उपस्थित स्वामीजींची पाद्य पूजा केली.
कारंजी मठाचे पूज्य गुरुसिद्ध महास्वामी, रायचूरचे महंत स्वामी, कडोलीचे दुरुदुंडेश्वर स्वामी आणि रुद्राक्षी मठाचे भक्त सहभागी झाले होते.


के. बी. हिरेमठ यांनी स्वागत केले. सुरेश गडवी यांनी पाद्य पूजा केली. ए. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. मठपती यांनी आभार मानले.

Tags:

dr-shivabasav-shri-jayantotsava-celebration/