Accident

भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला धडक :सोनोलीचा ट्रॅक्टरचालक ठार

Share

भरधाव ट्रकने ट्रॅक्टरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालक पुलाखाली फेकला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दोन्ही वाहने पुलावरून खाली कोसळून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे .

विघ्नेश झंगरूचे (रा. सोनोली ) हा या अपघातात ठार झाला आहे . सोमवारी सकाळी , राकसकोप जवळून ट्रॅक्टर घेऊन चालला होता . समोरून येणाऱ्या ट्रकला रस्ता देण्यासाठी तो पुलावर थांबला होता . परंतु भरधाव आलेल्या ट्रकने , ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने विघ्नेश ट्रॅक्टर सह पुलाखाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला . या अपघातात ट्रकदेखील पुलावरून खाली पलटी झाला आहे .

बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आणि पंचनामा केला . अपघातस्थळी लोकांची खूप गर्दी जमली होती . विघ्नेशच्या अचानक झालेल्या अपघाती मृत्यूमुळे सोनोली गावावर शोककळा पसरली आहे .

Tags: