Belagavi

एंजल फाउंडेशन आयोजित महिलांच्या बाईक रॅलीला उत्तम प्रतिसाद

Share

एंजल फाउंडेशनच्या वतीने बेळगाव शहरातील महिलांसाठी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते . महाराष्ट्रीयन नऊवारी साडी , आकर्षक वेशभूषा आणि फेटे बांधून महिला आपल्या बाइकसह या रॅलीत सहभागी झाल्या होत्या .

रविवारी एंजल फाउंडेशनच्या वतीने बेळगावच्या महिलांसाठी आयोजित केलेल्या रॅलीचा शुभारंभ कॉलेज रोडवरील महिला विद्यालयापासून करण्यात आला . आपल्या वेगवेगळ्या बाईक घेऊन , 100 हुन अधिक महिला नटून सजून या रॅलीत सहभागी झाल्या होत्या .

यापैकी 17 जणींची सर्वोत्कृष्ट बाईक रायडर म्हणून निवड करण्यात आली . पुरुषांची मक्तेदारी असलेल्या रॉयल एन्फिल्ड सारख्या बाईक घेऊन , सुंदर आणि आकर्षक वेशभूषा केलेल्या आणि सर्वोत्कृष्ट ठरलेल्या महिलांनी आपली प्रतिक्रिया यावेळी इन न्यूजच्या आपली मराठीशी व्यक्त केली .

एकंदर एंजल फौंडेशनने आयोजित केलेल्या या बाईक रॅलीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .

Tags: