राज्यातील सर्व जनतेला वेळेवर आणि माफक आरोग्य सेवा देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.
हावेरी जिल्ह्यातील शिग्गाव येथे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते आज जिल्हा प्रशासन व जिल्हा पंचायत हावेरी आणि आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या वतीने अद्ययावतीकरणाच्या इमारतीची पायाभरणी प्रसंगी करण्यात आली. शिग्गावचे 100 खाटांचे सार्वजनिक रुग्णालय 250 खाटांच्या अद्ययावत सार्वजनिक रुग्णालयात रूपांतरित करण्यात येणार आहे. या रुग्णालय इमारतीच्या बांधकामासाठी मुख्यमंत्री बोम्मई यांनी भूमिपूजन करून चालना दिली.
त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, गोरगरीब जनतेला, कष्टकऱ्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कर्नाटक सरकारने केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेसह आरोग्य कर्नाटक योजना जारी करून जनतेला दिलासा दिला आहे. त्याचा राज्यातील लाखो गोरगरीब लाभ घेत आहेत. सरकारी इस्पितळे, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि क्षेम केंद्रे सुसज्जित करून शहरी भागासह ग्रामीण जनतेला आरोग्य सेवा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या दृष्टीने पावले टाकण्यात येत असून, त्यात यशही मिळत आहे असे बोम्मई म्हणाले.
यावेळी कामगार मंत्री शिवराम हेब्बर, विधान परिषद सदस्य एस. व्ही. संकनूर आदी उपस्थित होते.


Recent Comments