Belagavi

मराठा समाजाला २ए मध्ये समाविष्ट करण्याची मागणी : २०डिसेंबरला काढणार भव्य रॅली

Share

मराठा समाजाला ३ बी मधून काढून २ ए श्रेणी द्यावी, या मागणीसाठी एक विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व मराठा समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे महापूजा करून या रॅलीचे महत्त्व व जनजागृती सुरू केली असून आगामी काळात हे आंदोलन मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे.

व्हॉइस ओव्हर : मराठासमाजाची कर्नाटकात ६० ते ७० लाखांच्या लोकसंख्या आसपास असल्याने आमच्या समाजाच्या विकासाच्या दृष्टीने , शिक्षण, व्यवसाय, स्टार्ट अप, सरकारी आणि खाजगी संस्थांमधील नोकऱ्यांमध्ये यामध्ये आरक्षण देणे गरजेचे आहे .
तर आपल्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व आपल्या मागणीच्या पूर्ततेसाठी २०

डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता सुवर्ण विधानसौध बेळगाव समोर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

यावेळी .व्ही.एस.श्यामसुंदर गायकवाड, भाजपा कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव व मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव, भाऊसाहेब जाधव,विनायक कदम,मनोहर कडोलकर व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: