Belagavi

लवकरच टी.टेक पार्कच्या उभारणीसाठी प्रयत्न करणार : खा . मंगला अंगडी

Share

– बेळगाव येथे द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्स आणि बेळगाव फाउंड्री क्लस्टरतर्फे आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
: बेळगावमध्ये औद्योगिक कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित परिषदेचे उद्घाटन खासदार मंगला अंगडी यांनी केले.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या कि बेळगाव पुरेशा प्रमाणात विकसित झाले आहे आणि त्याचा विस्तार अजूनही वाढत आहे.एअर ट्रेनच्या सुविधांसह औद्योगिक विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा बेळगावला उपलब्ध करून देण्यात आल्या असून लवकरच टी.टेक पार्कच्या उभारणीसाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करत आहोत.

आमदार अभय पाटील, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्स बेळगावचे कार्याध्यक्ष रमेश जंगल, फाउंड्री क्लस्टरचे कार्याध्यक्ष राम भंडारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. इंस्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सचे राज्य मानद सचिव डॉ. एम.टी.रंगारेड्डी हे परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी होते.
फाउंड्री क्लस्टरचे मानद सचिव सदानंद हुंबरवाडी, विलास बदामी, प्रा.वीरण्णा डी.के व व्यापारी उपस्थित होते.

Tags: