Belagavi

मुरुघा मठ प्रशासकपदी बसवतत्व जाणाऱ्यांची नियुक्ती करा : डॉ. एस. एम. जामदार

Share

राज्यातील महत्त्वाचा लिंगायत मठ असलेल्या चित्रदुर्ग मुरुघा मठात झालेल्या बालिका अत्याचार प्रकरणानंतर सरकारने मठावर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला आहे, हे स्वागतार्ह आहे. पण प्रशासक म्हणून बसवतत्वांची जाण असलेल्या व्यक्तीची नियुक्ती करावी अशी मागणी जागतिक लिंगायत महासभेचे सरचिटणीस व निवृत्त ज्येष्ठ आयएएस अधिकारी एस. एम. जामदार यांनी केली आहे.

व्हॉईस : बेळगावात आज शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. एस. एम. जामदार म्हणाले, सुमारे 400 वर्षांचा इतिहास असलेला हा मठ बसवतत्वांचा प्रसार करत आहे. या मठावर नवीन प्रशासक नेमण्यास आमचा पूर्ण पाठिंबा आहे. परंतु प्रशासक म्हणून बसवतत्व आचरणात आणणारी आणि जाणणारी व्यक्ती असावी.

मूलभूत बसव तत्त्वांचे सामान्य ज्ञान असणारा प्रशासक नेमावा. वीरशैव आणि वैदिक पार्श्वभूमीच्या व्यक्तीची नियुक्ती करू नये. लिंगायत संस्कृतीची जाण नसलेल्या व्यक्तीची नियुक्ती केल्यास त्याला आमचा पूर्ण विरोध राहील असे ते म्हणाले. बाईट
मठाच्या बदनाम झालेल्या शिवमूर्ती स्वामीजींच्या पदावनतीनंतर योग्य व्यक्तीची प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करताना सरकारने बसव तत्वांची चांगली जाण असलेल्या अधिकाऱ्याचीच नियुक्ती करावी असे ते म्हणाले. बाईट
पत्रकार परिषदेला बसवराज रोटी, अशोक मळगली आदी उपस्थित होते

Tags: