जिल्हा गव्हर्नर आरटीएन व्यंकटेश (बबन) देशपांडे आणि बेळगाव रोटरी परिवारच्या सर्व सदस्यांनी व्हीटीयूजवळ महिलांच्या कार रॅलीचे स्वागत केले .
या कार रॅलीचे नेतृत्व डॉ . अनिल परमार , पीडीजी दीपक पुरोहित ,पीडीजी रश्मी कुलकर्णी यांनी केले . या विशेष महिला रॅलीमध्ये 88 महिलांचा सहभाग आहे. या रॅलीचा मार्ग पुणे – सोलापूर – विजापूर हंपी बंगलोर चिकमंगळूर ,मंगळूर , उडुपी ,मणिपाल, होन्नावर , गोवा , बेळगावी, निपाणी, कराड पुणे असा आहे. एकूण २६ कार ५ दिवसांत २१०० किमीचा प्रवास करीत आहेत . कन्या सक्षमीकरण , प्लास्टिकबंदी , व्यसनमुक्ती , अवयव दान याबाबत जनजागृती करणे हा या रॅलीचा उद्देश आहे

समाजात प्रभाव निर्माण करण्यासाठी सहभागी सामुदायिक ठिकाणी स्ट्रीट प्ले, फ्लॅश मॉब करत आहेत. वरील चार थीमबद्दल अधिक माहिती शेअर करण्यासाठी आम्ही स्थानिक भाषेत स्टिकर्स देखील चिकटवला आहेत . स्थानिक लोकांना वैयक्तिक मुलाखतींसह जोडणे हा संदेश पसरवण्याचा आणखी एक मार्ग आहे. 2 डिसेंबर रोजी कात्रज पुणे येथे रॅलीची सांगता होईल.अशी माहिती डॉ . अनिल परमार यांनी दिली .
28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर पर्यंत सर्व महिला कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे .


Recent Comments