हिंडलगा येथून विद्यार्थ्यांसाठी सकाळच्या वेळेत बससेवा सुरु करण्याची मागणी हिंदू राष्ट्र सेनेने केली आहे .
हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने हिंडलगा येथून सकाळी 8 ते 9 या वेळेत शाळा कॉलेज ला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बस मिळत नसल्याने तसेच परगावातून येणाऱ्या बसेस थांबत नसल्याने त्वरित हिंडलगा येथे बस चालू करावी या साठी श्री राम सेनेचे जिल्हा अध्यक्ष रविकुमार कोकितकर व सहकाऱ्याने आज के एस आर टी सी च्या अधिकाऱ्याना भेट देऊन त्वरित बस चालू करण्याची मागणी केली.
या वेळी उपस्थित रविकुमार कोकितकर. नागेश सराफ. संतोष जाधव. विनायक हंगरगेकर. अक्षय पाटील परशराम शहापूरकर. जोतिबा नाकाडी.व अन्य सहकारी उपस्थित होते


Recent Comments