Belagavi

जागतिक एड्स दिनानिमित्त जागृती रॅली : एड्सबद्दल केली जनजागृती

Share

जागतिक एड्स दिनानिमित्त बेळगावमध्ये एडससंदर्भात जागृती करण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते . जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . महेश कोणी यांनी या रॅलीला चालना दिली .

१ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून ओळखला जातो . या दिनानिमित्त जिल्हा प्रशासन , जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग यांच्या वतीने , जिल्हा एड्स प्रतिबंध आणि एड्स नियंत्रण विभागातर्फे विविध विभाग आणि एनजीओच्या सहकार्याने जागृती रॅली काढण्यात आली . बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ , या रॅलीला हिरवे निशाण दाखवून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . महेश कोणी यांनी चालना दिली .

यावेळी माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . महेश कोणी म्हणाले कि,१ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो . एडस या रोगासंबंधी नागरिकांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने बीम्स मेडिकल कॉलेजच्या वतीने , विविध विभाग तसेच एनजीओ च्या सहकार्याने ह्या रॅलीचे आयोजन केले आहे . एड्सबद्दल जागृती करण्याबरोबरच , एड्सग्रस्तांचे मनोबल वाढवणे , एड्सबाधित मृतांना श्रद्धांजली वाहणे या मागचा उद्देश आहे . लोकांमध्ये बरीचशी जागृती झाल्याने आता एड्सग्रस्त रुग्णांचा आकडा 0.9 वरून 0.5 इतका झाला आहे .

विविध कलापथकानी आपल्या कलाप्रदर्शाद्वारे जागृती केली .त्याचप्रमाणे विविध नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी , विद्यार्थिनी , आशा कार्यकर्त्या , तसेच एनसीसी कॅडेट्स सहभागी झाले होते . जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरु झालेल्या या जागृती रॅलीची बीम्सच्या आवारात सांगता करण्यात आली .

Tags: