3 व 4 डिसेंबर रोजी उद्योग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहित इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअर्सचे अध्यक्ष रमेश जंगल यांनी दिली
गुरुवारी शहरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. इंडस्ट्रीज 4.0 या विषयावर चर्चासत्र आयोजित केले जाणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार मंगला अंगडी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
4 डिसेंबर रोजी होणाऱ्या परिसंवाद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या शंकर उपस्थित राहणार आहेत . इंडस्ट्रीज 4.0 या विषयावर केएलईचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांचे व्याख्यान होणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी या चर्चासत्रात सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा.
इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंगतर्फे दरवर्षी सेमिनारचे आयोजन केले जाते. त्यानुसार यावेळीही बेळगावात आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
राम भंडारी यांनी माहिती देताना , बेळगावातील औद्योगिक कंपन्या विकसित करण्यासाठी सरकारशी चर्चा सुरू आहे. येत्या अधिवेशनात याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी व्ही.बी.जवुर, विलास बदामी आदी उपस्थित होते.


Recent Comments