बेळगावमधील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठात आयोजित ‘युवा सौरभ-2022’ कार्यक्रमाचे उद्घाटन डीसीपी पी. व्ही. स्नेहा यांच्या हस्ते आज करण्यात आले.

कन्नड आणि संस्कृती खाते, सार्वजनिक शिक्षण विभाग आणि व्हीटीयू यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी बेळगाव येथील विश्वेश्वरय्या टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम सभागृहात ‘युवा सौरभ-२०२२’ या युवा प्रतिभा दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन करताना डीसीपी पी.व्ही. स्नेहा यांनी सांगितले की, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होईल, विध्यार्थ्यांना अमली पदार्थांपासून दूर रहा असे सांगून अंमली पदार्थांमुळे होणाऱ्या हानीबाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी व्हीटीयूचे कुलगुरू डॉ. एस. विद्याशंकर, डॉ. प्रल्हादा राठोड, बी. ई. रंगास्वामी, एम. ए. स्वप्ना, कन्नड आणि संस्कृती विभागाच्या उपसंचालक विद्यावती भजंत्री आणि इतर मान्यवर, प्राध्यापक आणि विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.


Recent Comments