बेळगाव येथील चिंतामणराव शासकीय पदवीपूर्व कॉलेजच्या सभागृहात आज बारावी परीक्षा आधारित मार्गदर्शक पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा पार पडला.
दिशा फाऊंडेशनतर्फे पदवीपूर्व द्वितीय वर्षाच्या विज्ञान, वाणिज्य आणि कला विभागाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अनुकूल पुस्तकाचे प्रकाशन आणि वितरण समारंभ शहापूर-बेळगाव येथील सरकारी चिंतामणराव शासकीय पदवीपूर्व कॉलेजच्या सभागृहात आज बुधवारी पार पडला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन करून बोलताना बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आ. अनिल बेनके यांनी, येत्या काही दिवसांत पीयूसी द्वितीय वर्षाची परीक्षा येत आहे. विध्यार्थ्यांना या काळात हे पुस्तक अत्यंत उपयोगी पडेल. विध्यार्थ्यांनी या पुस्तकाचा उपयोग करून उच्च गुण मिळवण्यासाठी कठोर अभ्यास करावा, तरच या पुस्तकाचा उद्देश पूर्ण होईल असे सांगितले.
गेल्या दहा वर्षांपासून बेळगाव जिल्ह्यातील माध्यमिक पीयूसी विद्यार्थ्यांचे निकाल प्रसिद्ध झाले तेव्हा असे दिसून आले की, राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये आपला जिल्हा 24 ते 28 व्या क्रमांकावर होता. आता मोफत वाटण्यात येणाऱ्या या पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करा. दिशा संस्थेतर्फे आणि आमच्या बेळगावच्या विद्यार्थ्यांना निकालात ८०% पेक्षा जास्त गुण मिळवण्याची संधी आहे त्यांनी त्याचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन राणी चेन्नम्मा विद्यापीठाचे अर्थ कुलसचिव मुरुगेश एचएम यांनी केले.

या कार्यक्रमाला बेळगावचे पदवीपूर्व शिक्षण उपसंचालक महादेव कांबळे यांच्यासह विज्ञान शिक्षक मालतेश पाटील, कन्नडचे प्राध्यापक प्रवीण पाटील, वाणिज्य प्राध्यापक महेश कारेकर, महादेव धरीगौडा, कला विषय शिक्षक नागराज मरेनावर व शहरातील तरुण कापड व्यापारी वैभव देशपांडे उपस्थित होते.


Recent Comments