बेळगावमधील एका भक्ताने जुनी नाणी जमा करून कृष्ण मंदिराची प्रतिकृती तयार केली आहे
तुम्ही पहात असलेले हे छोटेसे कृष्णमंदिर सध्या चलनात नसलेल्या 5, 10, 20 पैशांच्या नाण्यांनी बनवलेले आहे. होय, बेळगावच्या काकतीवेस येथील रहिवासी अनंत अप्पाण्णा यांनी आपल्या देव्हाऱ्यात हे छोटेसे मंदिर बनवले आहे . अनेक वर्षांपासून जमा केलेल्या जुन्या नाण्यांचा यासाठी वापर करण्यात आला आहे .
अनंत अप्पाण्णा यांनी याबद्दल आपली मराठीला माहिती देताना सांगितले कि , त्यांनी आम्हाला बेळगावच्या केएमएफ येथील गणपती मंदिरातून आपल्याला ही नाणी दिली गेली . त्यापासून आम्ही हे मंदिर बांधले . 5 पैशांची 150 हून अधिक नाणी यासाठी वापरली आहे . आम्ही प्रत्येक खांबावर 10 पैशांची 35 नाणी ठेवली आहेत . तसेच 20 पैशांच्या 150 नाण्यांचा वापर देखील केला आहे . दुकानातून कृष्णाची मूर्ती आणून बसवली. तसेच मंदिराला सोनेरी आणि चंदेरी रंग दिला आहे . आता माझ्याकडे 25 पैशांची 250 स्टीलची नाणी आहेत. त्याचप्रमाणे 50 पैशांची 250 नाणी आहेत. त्यापासून पुन्हा काहीतरी बनवण्याचा विचार आहे .
आपण दगड, माती, स्टील आणि इतर साहित्याने मंदिर बांधताना पाहिले आहे. मात्र बेळगावच्या या भाविकांनी जुन्या नाण्यांमधून छोटेसे मंदिर उभारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.


Recent Comments