Gokak

गोकाकमध्ये करवेची निदर्शने :महा मंत्र्यांना बेळगावात येण्यास करावा मज्जाव

Share

आधीच जत, अक्कलकोट , सांगली , मिरज या भागांना मूलभूत सुविधा देता येत नाहीत आणि , कर्नाटकातील गावे पाहिजे असे म्हणणे मूर्खपणाचे आहे असे , रयत गटाचे करवे अध्यक्ष रेहमान मोकाशी म्हणाले .

गोकाक मधील घटप्रभा येथील मृत्युंजय चौकात , कन्नडपर संघटनांनी संकेश्वर -जेवर्गी मार्ग अडवून निदर्शने केली .

यावेळी रयत गटाचे करवे अध्यक्ष रेहमान मोकाशी म्हणाले कि , बेळगावमधील एम इ एस , आमचया राज्याच्या सर्व सुविधा मिळवून , महाराष्ट्रात जाण्याची भाषा करीत आहेत . त्यांनी महाराष्ट्रात जरूर जावे पण इथल्या मातीशी गद्दारी करू असा संताप व्यक्त केला . एवढेच नाही तर महाराष्ट्रातील मंत्री बेळगावला येणार असल्याचे सांगत आहेत त्यांना पोलीस विभागाने इथे येण्यास परवानगी देऊ नये . काही अनर्थ घडल्यास याला पोलीस विभाग जबाबदार राहील असा इशारा दिला .

यावेळी कन्नडपर संघटनेचे अध्यक्ष केम्पण्णा चौकासी , प्रशांत अरळीकट्टी , अप्पासाब मुल्ला , आनंद गाडीवड्डर , मीरा बळीगार , सहित यावेळी उपस्थित असलेल्या सर्वानी पोलीस निरीक्षकाने निवेदन दिले .

Tags:

krv-protest-against-maharashtra-cm/