Belagavi

हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून गायीवर विधिपूर्वक अंत्यसंस्कार

Share

बेळगाव-वेंगुर्ला रोडवर अपघातात मरण पावलेल्या गायीवर हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी विधिपूर्वक अंत्यसंस्कार केले.

बेळगाव-वेंगुर्ला रोडवर सिंधी कॉलनीजवळ आज झालेल्या अपघातात एक गाय मरण पावली. याची माहिती मिळताच हिंदुराष्ट्र सेना, श्रीराम सेना, बजरंग दल आदी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हिंदू धर्माच्या रितीरिवाजानुसार विधिपूर्वक अंत्यसंस्कार केले.
हिंदुराष्ट्र सेना, श्रीराम सेना जिल्हाध्यक्ष रवीकुमार कोकितकर यांच्या नेतृत्वाखाली साईनाथ पाटील, मंथन बोकडे, रोहन पाटील, दिनेश पाटील, बाळू पाटील, युवराज कदम, सूरज भातकांडे आदी कार्यकर्त्यांनी यात पुढाकार घेतला.

Tags: