Chikkamagaluru

कोप्पच्या जनसंकल्प यात्रेचे मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उदघाटन

Share

चिकमंगळूर जिल्ह्यातील कोप्प शहरातील लाल बहादूर शास्त्री स्टेडियममध्ये भाजपने आयोजित केलेल्या जनसंकल्प यात्रेचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज उद्घाटन केले.

जनसंकल्प यात्रेच्या माध्यमातून पुढील निवडणुका जिंकून सत्ता काबीज करण्याचे नियोजन भाजपने केले आहे. चिकमंगळूर जिल्ह्यातील कोप्प शहरात रविवारी जन संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्याचे उद्घाटन केले.

यावेळी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी, मंत्री बैरती बसवराज, गोविंद कारजोळ, माजी मंत्री डी. एन. जीवराज आणि चिकमंगळूर जिल्ह्याचे आमदार उपस्थित होते.

Tags:

bjp-jana-sankalp-yatra-at-kopp-town-cm-inagurate/