Belagavi

विविध संविधानाच्या वतीने संविधान दिन साजरा

Share

बेळगावच्या आंबेडकर उद्यानात , विविध संघटनांच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला .

शनिवारी संविधान दिनानिमित्त , शहरातील आंबेडकर उद्यानातील डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विविध संघटनांच्या वतीनेपुष्पहार अर्पण करण्यात आला आला . यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले तसेच शपथ घेण्यात आली .

यावेळी शेतकरी नेते सिद्धगौडा मोदगी यांनी समस्त नागरिकांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या . यावेळी त्यांनी संविधानाबद्दल माहिती दिली . ते म्हणाले कि आपल्या देशाला मोठे योगदान देणार आंबेडकरांची राज्यघटना आपल्या देशालाच नाही तर संपूर्ण जगासमोर आदर्शवत आहे . संविधानाच्या पायावर देश उभा आहे .

यावेळी दलित नेते मल्लेश चौगुले , महादेव तळवार , विठ्ठल बांगोडी . शंकर ढवळी आदी उपस्थित होते

Tags:

/constitution-day-celebration-at-ambedkar-garden-belgaum/