Belagavi

कंकणवाडी आयुर्वेद महाविद्यालयात आंबेडकर प्रतिज्ञा वाचन कार्यक्रम

Share

बेळगावात कंकणवाडी आयुर्वेद महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त डॉ. बी. आर. आंबेडकर प्रतिज्ञा वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

बेळगाव येथील केएलई संस्थेच्या डॉ. बी. एम. कंकणवाडी आयुर्वेद महाविद्यालयाच्या सभागृहात आज, शनिवारी कन्नड आणि संस्कृती विभाग आणि कंकणवाडी आयुर्वेद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान दिन सोहळा आणि डॉ. बी. आर. आंबेडकर प्रतिज्ञा वाचन कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीशैल मठपती यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कन्नड आणि संस्कृती खात्याच्या उपसंचालक विद्यावती भजंत्री, डॉ. हिरेमठ, संदीप सगरे आदींचा सहभाग होता.

Tags:

kanakawadi-college-read-ambedkar-programm/