Belagavi

महाराष्ट्र सरकार विरोधात करवेची निदर्शने

Share

कर्नाटक बसला काळे फासल्यामुळे तसेच दगडफेक केल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी बेळगावात करवे शिवरामेगौडा गटाच्या वतीने निदर्शने करण्यात आले.

करवे जिल्हाध्यक्ष वाजीद हिरेकोडी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील राणी चन्नम्मा सर्कलमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिकृती फाडून कन्नड कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून संताप व्यक्त केला.

वाजीद हिरेकुडी यांनी यावेळी बोलताना, कर्नाटकच्या बसेसवर महाराष्ट्रात काळे फासले जात आहे . दगडफेक केली जात आहे . आम्ही ते खपवून घेणार नाही . आपले कर्नाटक सरकार काहीही न करता बसले आहे. तुम्हाला धडा शिकवायला हवा. पुढील आठवड्यात बेंगळुरूहून हजारो सैनिक बेळगावात दाखल होतील. यावेळी हिरेकोडी यांनी एमईएस, शिवसेनेवर बंदी घालण्याची मागणी केली.

कर्नाटक रक्षण वेदिकेचे अनेक पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

Tags: