गोकाक तालुक्यातील घटप्रभा येथील तरुणाच्या खून प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात गोकाक पोलिसांना यश आले आहे.
13 नोव्हेंबरच्या रात्री गोकाक शहरातील शिंगळापुरा पुलावर घटप्रभा येथील सोमलिंग सुरेश कंबार या २० वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे हातपाय बांधलेले होते. त्याचा मृतदेह एका जुन्या लाईटच्या खांबाला बांधलेला आढळून आला.
9 नोव्हेंबर रोजी सोमलिंग कंबार याच्या आईने घटप्रभा पोलीस ठाण्यात आपला मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह सापडल्यानंतर गोकाकचे डीएसपी मनोजकुमार नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने खुनाचा गुन्हा दाखल करून तपास केला असून, आता या प्रकरणाचा छडा लावत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देताना एसपी डॉ.संजीव पाटील यांनी सांगितले कि , या प्रकरणातील मृत तरुणाची आई फुले व काजू विकत होती. त्यांना सहा मुली आणि दोन मुलगे आहेत. ज्यामध्ये मृत सोमलिंग याने आयटीआयचे शिक्षण घेतले असून तो याआधी गोव्यात काम करीत होता. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी तो हिंडलगाजवळील एका फायनान्स कंपनीत कामाला लागला होता. 8 नोव्हेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास घटप्रभा येथे गेल्यानंतर त्यांचा फोन बंद झाला. या प्रकरणाचा तपास करून गोकाकचे डीएसपी मनोज कुमार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोन आरोपींना अटक केली. उर्वरित आरोपींसाठी सापळा रचण्यात आला आहे.
मृत व्यक्तीची काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर एका तरुणीशी ओळख झाली होती. त्यानंतर ते एकमेकांशी मेसेजिंग आणि व्हिडिओ कॉल करत होते . . पण त्या तरुणीचे लग्न दुसऱ्या मुलाशी ठरले आहे. मात्र तरीही दोघांचे मेसेज सुरु होते . त्या मुलीच्या होणाऱ्या नवऱ्याला जेव्हा हा प्रकार कळला तेव्हा त्याने मुलीच्या घरच्यांना माहिती दिली. त्यानंतर 8 नोव्हेंबरच्या रात्री घटप्रभा येथून सदर मुलीने फोन करून सोमलिंगाला बोलावून घेतले . आणि मुलीच्या नातेवाईकांनी त्या तरुणाला घरी बांधून ठेवले. नंतर ते त्याला फार्महाऊसवर घेऊन गेले आणि तारेने त्याचा गळा आवळून खून केला . त्यानंतर हात-पाय बांधून शिंगळापुर पुलावर मृतदेह टाकून देण्यात आला . या खून प्रकरणी वापरण्यात आलेल्या फोनचे ट्रेसिंग सुरू आहे. आरोपींची हा फोन रेल्वेत सोडून दिला होता ,. तो एका व्यक्तीला सापडला असून त्या व्यक्तीने मिरज ते खानापूर असा प्रवास केला आहे . आता त्या फोनचा लोकेशन बंगळूरमध्ये सापडले आहे . पोलीस तो फोन मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत . आरोपी आणि महिलेच्या काकाला अटक करण्यात आली आहे. आणखी तीन ते चार आरोपींची चौकशी करून त्यांना अटक करणे बाकी आहे. तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
एकंदरीतच, मुलीच्या हितासाठी तरुणाची निर्घृण हत्या करणारे आरोपी सध्या तुरुंगात आहेत. गोकाक पोलिसांनी पुढील तपास हाती घेतला आहे. पत्रकार परिषदेला अप्पर पोलीस अधीक्षक महानिंग नंदगावी उपस्थित होते. खून प्रकरणाचा छडा लावल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गोकाक पोलिसांचे अभिनंदन केले.


Recent Comments