Shivamogga

कर्नाटकातील पोलीस करीत आहेत कार्यक्षमतेने काम : मंगळूर स्फोटाचा आमच्या पोलिसांनी २४ तासात लावलाय छडा

Share

शिवमोग्गामध्ये आजपासून भारतीय जनता पक्षाचे तीन दिवसीय राज्य प्रशिक्षण वर्ग सुरु झाले .मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या राज्य प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन केले .

तीन दिवसीय राज्य प्रशिक्षण शिबिराचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले . यावेळी माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा , भाजप राज्य उपाध्यक्ष निर्मल कुमार खुराना , माजी आ . श्रीकांत कुलकर्णी , उपस्थित होते . उदघाटनानंतर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले कि , कर्नाटकातील पोलीस कार्यक्षमतेने काम करीत आहेत . २४ तासात आमच्या पोलिसांनी ऑटोमधील कुकर बॉम्ब स्फोट प्रकरणाचा छडा लावला आहे . राज्यात दहशतवादी कारवाया खपवुन घेतल्या जाणार नाहीत.
महाराष्ट्र सीमावादावर सरकारची भूमिका स्पष्ट आहे . ते म्हणाले कि , राज्य सरकारने जे काही करणे आवश्यक आहे ते सर्व आधीच केले आहे .

Tags: