Belagavi

दुरदुन्डेश्वर जत्रा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

Share

बेळगाव येथील एपीएमसी मार्केट यार्ड येथील श्री वीरशैव दुरदुंडेश्वर मठाचा जत्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

जत्रा महोत्सवानिमित्त , शुक्रवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास रुद्राभिषेक तसेच भगवान श्री दुरदुंडेश्वराची विशेष पूजा करण्यात आली. तसेच होम-हवन, महामंगलारती करण्यात आली. यावेळी हजारो भाविकांनी देवाचे दर्शन घेतले, यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते .

कर्नाटक रक्षण वेदिकेचे उत्तर कर्नाटकचे राज्य अध्यक्ष महांतेश रणगट्टीमठ यांनी जत्रा महोत्सवाबाबत माहिती दिली.दरवर्षी प्रमाणे यंदाही जत्रा महोत्सवानिमित्त होम, हवन, महापूजा, महाप्रसाद व सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. हा माथा अरभावी दुरदुंडेश्वर मठाची शाखा आहे. रवी हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली पूजा करण्यात आली. असे ते म्हणाले.

मुरुगेंद्र शास्त्री म्हणाले की दुरदुंडेश्वर एक चमत्कारी माणूस होता. त्यांनी समाजात खूप परोपकार केले. भक्तांच्या उत्कर्षासाठी त्यांनी परिश्रम घेतले.
दुरदुंडेश्वर जत्रा महोत्सवात आसपासच्या भागातील लोक सहभागी झाले होते .

Tags:

/belagavi-durdundeshwara-jatra/