Belagavi

सीमावाद पुन्हा उफाळला ! महाराष्ट्राची बससेवा तात्पुरती बंद

Share

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुहा उफाळला आहे. त्यामुळे एकमेकांच्या बसेसना काळे फासण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून बेळगावकडे येणाऱ्या बसेस तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत.

होय, महाराष्ट्र कर्नाटकात कळीचा मुद्दा ठरलेला बेळगावचा सीमावाद पुन्हा एकदा उफाळला आहे. कर्नाटकाच्या केएसआरटीसी बसला महाराष्ट्रात दौंड येथे तिथल्या मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी काळे फासून कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या सीमाप्रश्नी प्रक्षोभक विधानाचा निषेध केला आहे. त्याचीच री ओढण्याची तयारी कर्नाटकाच्या हद्दीत कानडी पुंडानी चालवली आहे. आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महाराष्ट्र बसेसजवळ आणि कर्नाटकात अचानक काळ्या काजळीचा प्रादुर्भाव झाल्याने 300 हून अधिक बसेसची वाहतूक तात्पुरती बंद केली आहे. एमएसआरटीसीच्या बसेस बेळगाव, चिक्कोडीसह राज्याच्या अनेक भागात धावतात. त्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र कर्नाटकातून महाराष्ट्रात नेहमीप्रमाणे बसेस धावत आहेत.

Tags:

temporarily-stopped-maharashtra-bus/