Vijayapura

भंडाऱ्याची अमोघसिद्ध देवाची जत्रा मोठ्या थाटामाटात संपन्न

Share

कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील सुक्षेत्र गुड्डापूर येथे दानम्मा देवीचा जत्रा सुरु असतानाच विजापूर तालुक्यातील अरकेरी येथील मुम्मेट्टीगुड्ड या पवित्र ठिकाणी लाखो लोकांच्या उपस्थितीत शेकडो पालखींचे दर्शन हे मुख्य आकर्षण ठरत आहे. यावेळी अमोघसिद्ध महाराज मंदिराचा संपूर्ण 100 एकर परिसर भंडाऱ्याने भरला होता.

अमोघसिद्ध महाराजांच्या जत्रेत कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेशसह विविध राज्यांतील लाखो भाविकांनी पालखीचे दुर्मिळ दर्शन घेतले. शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या अरकेरी येथील अमोघसिद्ध देवाला सर्व जातीधर्माचे लोक येतात . त्यामुळे कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेशसह विविध जिल्ह्यांतील लाखो लोक पायी या ठिकाणी येत आहेत. याशिवाय तीन राज्यांचे प्रतिनिधी या मंदिराला भेट देतात हे विशेष.

ही एकमेव जत्रा आहे जिथे लाखो लोक आणि दोनशेहून अधिक पालख्या एकाच वेळी येतात. त्यामुळे कर्नाटकात विशेषत: उत्तर कर्नाटकात अरकेरी अमोघसिद्ध जत्रा खूप लोकप्रिय झाली आहे.अमोघसिद्ध महाराजांची प्रार्थना केल्यानंतर शेकडो पालखींवर भंडारा, खारीक आणि मेंढरांची लोकर उडवण्याची प्रथा आहे, असे जिल्हा पंचायत चे माजी अध्यक्ष अर्जुन राठोड यांनी सांगितले.

.या जत्रेचे वैशिष्ट्य म्हणजे कार्तिक अमावस्येच्या दिवशी इथला संपूर्ण परिसर भंडाऱ्याने पिवळे होऊन जाते .

Tags: