Belagavi

नागेश मन्नोळकराना बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून द्या उमेदवारी : रमेश जारकीहोळीचा मुख्यमंत्र्यांना आग्रह

Share

बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार म्हणून हिंडलगा ग्राम पंचायतीचे अध्यक्ष नागेश मन्नोळकर याना उमेदवारी द्यावी असे आ . रमेश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्र्यांना सूचित केले .

गुरुवारी , मुख्यमंत्री बेळगाव भेटीवर असताना , माजी मंत्री आ . रमेश जारकीहोळी यांनी हिंडलगा ग्राम पंचायतीचे अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली .
२०२३ मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी , बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचे उमेदवार म्हणून नागेश मन्नोळकर याना तिकीट द्यावे असे मुख्यमंत्र्यांना सूचित केले.

नागेश मन्नोळकर बेळगाव दक्षिण भागात चांगले काम करीत आहेत . गोरगरिबांना तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करीत आहेत . हिंडलगा ग्राम पंचायतीच्या व्याप्तीत त्यांनी अनेक विकास कामे राबवली आहेत . अशा व्यक्तीला आमदारपदी निवडून देण्यास जनातदेखील उत्सुक आहे . ग्रामीण मतदार संघातून काँग्रेसला हटवून भाजपच्या उमेदवाराला आमदारपदी निवडून आणायचे असेल तर नागेश मन्नोळकर योग्य उमेदवार ठरतील.

एकंदरीत , नागेश मन्नोळकर याना बेळगाव ग्रामीण मतदार संघातून तिकीट द्या असे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी सूचित केले आहे .

Tags:

ramesh-jarkiholi-bats-nagesh-mannolkar-for-belagavi-rural/