Belagavi

दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात दीपोत्सव

Share

दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेळगावच्या कपिलेश्वर मंदिरात कार्तिक मासानिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला .

बेळगावच्या कपिलेश्वर मंदिरात लक्ष दीपोत्सव साजरा करण्यात आला . दीपांच्या झगमगाटाने , मंदिर परिसर उजळून गेला होता . त्यात मंदिरावरील आकर्षक विद्युत रोषणाईमुळे मंदिर अधिकच खुलून दिसत होते .

दीपोत्सवानिमित्त मंदिराच्या आवारात सुंदर आकर्षक रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या . त्यावर लावलेले दीप रांगोळीचे रंग अधिकच सुंदर दिसत होते . दीपोत्सवानिमित्त मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती . मंदिराशेजारीच असलेल्या कपिलेश्वर विसर्जन तलावाच्या पायऱ्यांवर देखील दीप लावण्यात आले होते .

यावेळी भजन गायन स्पर्धा पार पडल्या  यावेळी मंदिर व्यवस्थापनाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली मराठीशी बोलताना माहिती दिली . यावेळी मंदिर विश्वस्त कमिटीचे पदाधिकारी तसेच भक्त मोठ्या संख्यने उपस्थित होते .

Tags: