Belagavi

बेंगळूरच्या कलाकारांची कुंदानगरीला भेट; दानम्मादेवी पूजेत सहभाग

Share

आपल्या कुंदानगरीची शान आयुष होसकोटे यांची थायलंडमधील मलेशिया येथे होणाऱ्या फॅशन शोसाठी निवड झाली आहे. पुढील महिन्यात थायलंडला जाणार्‍या आयुषला शुभेच्छा देण्यासाठी सॅन्डलवूडचे अनेक छोटे-मोठे कलाकार आज बेळगावात दाखल झाले होते.

होय, सॅन्डलवूडच्या “उग्रावतार” चित्रपटाची टीम बुधवारी कुंदानगरी बेळगावात दाखल झाली. बेळगाव येथील राजेंद्र होसकोटी आणि रुपाली होसकोटी यांच्या घरी झालेल्या श्री दानम्मादेवी पूजेत हे सर्व अभिनेते, अभिनेत्री आणि मान्यवर सहभागी झाले होते. ज्येष्ठ अभिनेत्री राधा रामकृष्ण यांची खास उपस्थिती होती. तसेच खासदार मंगल अंगडी आदी मान्यवरांचेही यावेळी आगमन झाले. या सगळ्यांनी, डिसेंबरमध्ये थायलंडमध्ये होणार्‍या फॅशन शोमध्ये सहभागी होण्यास निघालेला कुंदानगरीतील बालकलाकार आयुष होसकोटे याला शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना ज्येष्ठ अभिनेत्री राधा रामकृष्ण म्हणाल्या, राजेंद्र होसकोटी आणि रुपाली होसकोटी यांनी श्री दानम्मादेवी पूजा आयोजित केली होती. त्यामुळे आम्हाला बेंगळूरहून बेळगावला बोलावण्यात आले. यात सहभागी होऊन आम्हाला आनंद आणि समाधान मिळाले आहे. त्याचप्रमाणे त्यांचा मुलगा आयुष मलेशिया येथे होणाऱ्या किड्स स्टार इंटरनॅशनल स्पर्धेत सहभागी होत असल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे. बेळगाव शहर आणि येथील लोक सुंदर, चांगले आहेत, बेळगावातही चांगली प्रतिभा आहे. आयुष हे त्याचे उदाहरण आहे. त्याच्या पालकांनी इतक्या लहान वयात त्याला प्रोत्साहन आणि प्रेरणा दिली हे पाहून बरे वाटते, असे त्यांनी सांगितले.

प्रसारमाध्यमांना माहिती देताना आयुष म्हणाला, थायलंडमधील मलेशिया थे होणाऱ्या फॅशन शोसाठी माझी निवड झाली आहे. फॅशन शोमध्ये 68 देश सहभागी होणार आहेत. थायलंडमध्ये होणाऱ्या फॅशन शोमध्ये 68 देश सहभागी होणार असल्याचे त्याने सांगितले. मी देखील यात सहभागी होणार आहे आणि भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. थायलंडमधील एका कार्यक्रमात जाऊन तिथे मी फॅशन रॅम्पवर चालणार आहे आणि पोहणे, नृत्य आणि गायन स्पर्धांमध्ये भाग घेणार आहे, असे तो म्हणाला. प्रियांका उपेंद्र मॅडमसोबत मी अभिनय केला याचा मला खूप आनंद आहे.

यावेळी अभिनेत्री अंकिता होसकोटी हिने सांगितले की, मला खूप आनंद झाला आहे. मी आयुषला खूप खूप शुभेच्छा देते. मी आता 15 चित्रपट आणि 8 मालिकांमध्ये काम केले आहे. क्रांती या चित्रपटात मी अभिनय केला हे मला खूप छान वाटत आहे. क्रांती हा शाळेशी संबंधित चित्रपट आहे. हा चित्रपट २६ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. सर्वांनी हा चित्रपट बघून आशीर्वाद देण्याचे आवाहन तिने केले.

यावेळी अभिनेता दर्शन सूर्या म्हणाला की, मी गट्टी मेळ्यासह अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले. सध्या मी गुरुमूर्ती दिग्दर्शित ‘उग्रावतार’ या चित्रपटात काम केले आहे. यामध्ये प्रियांका उपेंद्र ऍक्शन क्वीनच्या भूमिकेत आहे. आयुष एका फॅशन शोमध्ये सहभागी होणार आहे. देव आयुषला आशीर्वाद देवो, तो नक्कीच सुपरस्टार होईल.

एकंदरीत, मलेशिया या दूरच्या देशात आमच्या कुंदानगरीची कीर्ती वाढवण्यास निघालेल्या आयुषला आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा.

Tags: