Davanagere

जगलूरमध्ये जन संकल्प यात्रेचा मुख्यमंत्र्यांनी केला शुभारंभ

Share

दावणगेरे जिल्ह्यातील जगलूर येथे, आज भाजपने आयोजित केलेल्या जनसंकल्प यात्रेचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी उद्घाटन केले.

राज्याच्या सर्व भागात भाजपकडून जनसंकल्प यात्रा काढली जात आहे . बुधवारी दावणगेरे जिल्ह्यातील जगलूरमध्ये जनसंकल्प यात्रा काढण्यात आली . सीएम बोम्मई यांनी या यात्रेचे उद्घाटन केले.

मंत्री गोविंद कारजोळ , भैरती बसवराज, बी.श्रीरामुलू, खासदार जी एम सिद्धेश्वर, आमदार एस.व्ही. रामचंद्रप्पा, एम.पी. रेणुकाचार्य, मडलु विरुपक्षप्पा, विधान परिषद सदस्य रविकुमार, के.एस.नवीन आदी उपस्थित होते.

Tags:

cm-bommai-drive-the-bjp-jana-sankalpt-yatra-at-jagaluru/