हिंडलगा येथील हिंडलगा हायस्कूलच्या 1987 -88 सालच्या बॅचमधील विद्यार्थी -विद्यार्थिनींचे स्नेहसंमेलन तब्बल 34 वर्षानंतर अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात पार पडले.
हिंडलगा हायस्कूलच्या सदर बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी संघटितपणे स्वखर्चातून शाळेच्या नूतन इमारतीची रंगरंगोटी करण्याद्वारे शाळेबद्दलची आपली आत्मीयता प्रकट केली. त्यानंतर सोमनाथ लॉन, बॉक्साइट रोड हिंडलगा येथे नागेश मन्नोळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलन पार पडले . यावेळी दिवंगत शिक्षकांना श्रद्धांजली वाहण्यात आली . संमेलनात हिंडलगा हायस्कूलच्या सर्व शिक्षकांचा माजी विद्यार्थी -विद्यार्थिनीतर्फे शाल, श्रीफळ व स्मरणिका देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी काही माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले
स्नेहसंमेलनास हिंडलगा हायस्कूलचे 1987 -88 सालच्या बॅचमधील बहुतांश विद्यार्थी -विद्यार्थिनी आवर्जून उपस्थित होते.


Recent Comments