Belagavi

रामदुर्गचे आमदार यादव यांच्यावर कारवाई करण्याची बेळगाव बार असोसिएशनची मागणी

Share

रामदुर्गचे भाजपचे आमदार महादेवप्पा यादव यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

रामदुर्ग तालुक्यातील बटकुरकी गावाजवळील सालापूर सिंचन कालव्याच्या भूमिपूजन समारंभात जाहीर भाषणात आमदार महादेवप्पा यादवाड यांनी वकिलांच्या प्रतिष्ठेला कलंक लावला आहे . हा संपूर्ण वकिली व्यवसायाचा अपमान आहे. . त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, या मागणीसाठी बार असोसिएशनच्या सदस्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विधानसभा अध्यक्षांना निवेदन दिले.

बार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रभू यतनट्टी यांनी यावेळी बोलताना सांगितले कि , महादेवप्पा यादवाड एक जबाबदार आमदार असून त्यांनी वकिलांच्या विरोधात केलेले विधान चुकीचे आहे . त्यांचे आमदार सदस्यत्व तात्काळ रद्द करण्याची मागणी त्यांनी केली.

सचिन शिवण्णावर , सुधीर चव्हाण, गिरीराज पाटील, एटी पाटील व बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि अन्य वकील आंदोलनात सहभागी झाले होते.

Tags: