Belagavi

बुडाकडून रामतीर्थनगर येथे अतिक्रमित अनधिकृत बांधकामावर कारवाई

Share

बेळगाव शहरातील रामतीर्थनगरमध्ये बेळगाव शहर विकास प्राधिकरणाकडून (बुडा ) अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली . बुडाच्या जागेवरील अनधिकृत बांधकामे यावेळी जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात आली.

बेळगाव शहरात सरकारी खुल्या जागेवर अतिक्रमणे मोठ्या प्रमाणावर होत आहेत . याला बुडाच्या जागा देखील अपवाद नाहीत . मंगळवारी रामतीर्थनगर येथील बुडाच्या स्कीम नंबर 61 मधील अनधिकृत बांधकाम अभियंता महांतेश हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली जेसीबीच्या साहाय्याने हटवण्यात आले .
यावेळी माहिती देताना अभियंता महांतेश हिरेमठ यांनी , कोणीही बुडाच्या जागेवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम करू नये . अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल . बुडा आयुक्त आणि बेळगाव शहर विकास प्राधिकरणाच्या वतीने आपण जनतेला विनंती करीत आहोत कि ,परवानगीशिवाय बांधकाम करू नये .. (बाईट )
एकंदरीत आज बुडाकडून रामतीर्थनगर येथे अनधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला .

Tags: