Belagavi

रामतीर्थनगरातील बसवेश्वर मंदिरात दीपोत्सव साजरा

Share

रामतीर्थनगर येथील बसवेश्वर मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला . आसपासच्या भागातील जनतेने तसेच लोकप्रतिनिधींनी या दीपोत्सवात भाग घेतला.

कार्तिक मासानिमित्त सोमवारी रामतीर्थनगर येथील श्री बसवेश्वर मंदिराच्या आवारात दीपोत्सव साजरा करण्यात आला . दीपोत्सवानिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती . यावेळी मंदिरात सवाद्य आरती करण्यात आली . भक्तांनी या दीपोत्सवाची मोठी गर्दी केली होती. मंदिर प्रांगणात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या . भाजपचे नेते मुरुगेन्द्रगौडा पाटील , नगरसेवक हनुमंत कोंगाळी यांनी या दीपोत्सवात सहभागी झाले होते.

दीपांच्या प्रकाशात मंदिर परिसर उजळून निघाला होता . यावेळी स्थानिकांनी देखील दीप लावून “तमसो मा ज्योतिर्गमय” अशी प्रार्थना केली.

Tags:

ramtirth nagar deepotsava