Belagavi

जेडीएस प्रदेशाध्यक्ष इब्राहिम यांचे काँग्रेस, भाजपवर कोरडे

Share

रमेश जारकीहोळी हे या भागाचे भक्कम मागासवर्गीय नेते आहेत. त्यांचे पक्षात स्वागत करणे चूक आहे, न करणे ही देखील चूक आहे असे सांगत त्यांच्याशी जेडीएस प्रवेशाबाबत चर्चा झाली नसल्याची जेडीएसचे प्रदेशाध्यक्ष सी. एम. इब्राहिम यांनी बेळगावमध्ये आज ‘नरो वा कुंजरो वा’ स्वरूपाची प्रतिक्रिया दिली.

माजी मंत्री व गोकाकचें आमदार रमेश जारकीहोळी जेडीएसमध्ये सामील होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत आपल्या बेळगाव भेटीत आज जेडीएसचे प्रदेशाध्यक्ष सी. एम. इब्राहिम प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, मला वैयक्तिकरित्या रमेश जारकीहोळी आवडतात.
मात्र याबाबत रमेश जारकीहोळी यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही फोनवर अनेकदा बोललो, पण त्यांच्या जेडीएसच्या प्रवेशाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही असे त्यांनी स्पष्ट केले. बाईट
इब्राहिम पुढे म्हणाले, जेडीएसमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्यांची यादी मोठी आहे. ती एवढ्यात जाहीर करणार नाही. आम्ही कोणालाही जेडीएसमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण दिलेले नाही. येणाऱ्यांनी डिसेंबरपर्यंत जेडीएसमध्ये सामील होण्याचे आवाहन मी त्यांना करतो असे ते म्हणाले. डिसेंबरची डेडलाईन का ठरवली, असा सवाल प्रसारमाध्यमांनी केला असता, आपल्याकडे कोणता आणि किती माल आहे हे आपण पाहिले पाहिजे.

त्यामुळे आम्ही डिसेंबरपर्यंत जेडीएसच्या प्रवेशाची पुष्टी करण्यास सांगितले आहे. काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याचे आमचे दोघांचे ध्येय एकच असल्याचे वक्तव्य रमेश जारकीहोळी यांनी केले आहे. त्यावर काँग्रेसचा पराभव झाला पाहिजे, हे खरं मग, भाजप का आमच्या काकांचा मुलगा आहे का? असा सवाल त्यांनी केला.

भाजप एक कंपनी सरकार आहे. कन्नडच्या बाजूने उभे राहण्याची आमची भूमिका आहे, आमचा पक्ष कन्नडीगांचा पक्ष आहे असे इब्राहिम यांनी सांगितले. जेडीएसमधील अनेकांनी काँग्रेसच्या तिकिटासाठी अर्ज केले असल्याचा प्रश्न प्रसारमाध्यमांनी उपस्थित केल्यावर सी. एम. इब्राहिम म्हणाले, मुलगी सुंदर, मस्त असेल तर तिला बघायला बरेच लोक येतात. त्यांनी तिकिट मिळण्यासाठी अर्ज केल्याचा दावा करत आमच्या पक्षाच्या उमेदवारीसाठी डाव आखला आहे. आमच्याकडे तिकिटांसाठी एक लाख किंवा दोन लाख द्या अशी प्रथा नाही.

मंगळूर स्फोटप्रकरणावर बोलताना इब्राहिम म्हणाले, मंगळुरूमध्ये बॉम्ब ठेवल्यानंतर तीन वर्षांपासून तुरुंगात असलेला मुलगा आरएसएसचा कट्टर कार्यकर्ता आहे. इकडे तिकडे बॉम्बस्फोट घडवणारी ही लहान-मोठ्या काकांची मुले आहेत. सरकार आता तुमच्या हातात आहे. कालच्या स्फोटात आरएसएसचा सहभाग आहे का, असा सवाल प्रसारमाध्यमांनी केला असता, मी कोणाचा हात आहे हे सांगणार नाही, पण जो आधीच तुरुंगात आहे तो आरएसएसचा आहे असे सीएम इब्राहिम म्हणाले. मंगळुरू विमानतळावर बॉम्ब ठेवला होता तेव्हा प्रसारमाध्यमांनी ते वृत्त जोरात दाखवले. शेवटी शोधल्यावर कोण सापडले? तेंव्हा तो केंद्रीय मंत्र्यांच्या सोबत उभा होता. आरएसएसचा सक्रिय कार्यकर्ता असल्याचे त्याने स्वत: कबूल केले आहे. त्याबाबत आजवर कोणी चकार शब्द काढलेला नाही. मुतालिक यांचे वक्तव्य आणि बजरंग दलाचे विधान बघा आणि तुम्हीच ठरवा. विधानाचे खंडन करावे की नाही याचा निर्णय घ्या. आता होस्कोटे येथे भाजप टिपू जयंती साजरी करत आहे. भाजपचे मंत्री एमटीबी नागराज होस्कोटे येथे वाढदिवस टिपू जयंती साजरी करत आहेत. संपूर्ण होस्कोटे येथे बॅनर लावण्यात आले आहेत. एकीकडे हे टिपूला शिव्या देतात आणि दुसरीकडे त्यांचा मंत्री टिपू जयंती साजरी करतो हा विपर्यास असल्याचे सीएम इब्राहिम म्हणाले.

एकंदर, रमेश जारकीहोळी यांच्या जेडीएस प्रवेशाबाबत स्वागताचे वक्तव्य करतानाच जेडीएस प्रदेशाध्यक्ष सी. एम. इब्राहिम यांनी काँग्रेस आणि भाजपवरही कोरडे ओढल्याचे यावेळी दिसून आले.

Tags: