विजापूर जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षकपदी वरिष्ठ पोलीस अधिकारी शंकर मारिहाळ यांची नियुक्ती केल्याचा आदेश काल, शनिवारी राज्य गृहखात्याने बजावला आहे. लवकरच ते नवीन पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.
शंकर मारिहाळ हे मूळचे बेळगाव तालुक्यातील मोदगा गावचे सुपुत्र आहेत. यापूर्वी त्यांनी बेळगावात मार्केट, निपाणीसह विविध पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून सेवा बजावली आहे. अलीकडेच त्यांची हुबळी येथे हेस्कॉम पोलीस अधीक्षकपदी बढतीवर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता विजापूर जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षकपदी शंकर मारिहाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एक मितभाषी, निगर्वी वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे.


Recent Comments