Belagavi

बेळगाव येथील बी.ए.सनदी सांस्कृतिक प्रतिष्ठान तर्फे ६७ वा कर्नाटक राज्योत्सव व जन्ना साहित्य पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

Share

के. एल .ई कॅन्सर हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.व्ही.जाली यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी बेळगावचे ज्येष्ठ साहित्यिक डॉ.रामकृष्ण मराठे होते. यावेळी जेष्ठ साहित्यिक प्राचार्य बी.एस.गवीमठ यांना कन्नड गडीतिलक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना बी.एस.गविमठ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


तसेच नवोदित लेखिका अनिल गुन्नापुर यांना त्यांच्या ” कल्लू हुवीन नेरळु” या कथासंग्रहासाठी जन्ना सनदी साहित्य राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फाऊंडेशनतर्फे पुरस्कारार्थींचा सत्कार करण्यात आला.
फाऊंडेशनचे कोषाध्यक्ष सीएम बुधीहाळ यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष ए.ए.सनदी यांनी प्रास्ताविक केले.सरचिटणीस शंकर बागेवाडी यांनी सूत्रसंचालन केले.रमानाथ बनशंकरी यांनी आभार मानले.

Tags: