कर्जाचा बोजा सहन न झाल्याने शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील बिदरकुंडी गावात घडली.
51 वर्षीय चंद्रशेखर कोटरप्पा कडूर असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी बँकेसह विविध ठिकाणांहून सुमारे आठ लाखांचे खासगी कर्ज घेतले होते. ते फेडता न आल्याने ते तणावाखाली होते. त्यातूनच त्यांनी स्वतःच्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी मुद्देबिहाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments