Belagavi

सेंट पॉल कॉलेजमध्ये 23 ते 29 नोव्हेंबर दरम्यान उर्जा महोत्सव : फादर रॉनी डिसोझा

Share

बेळगावातील सेंट पॉल कॉलेजच्या वतीने 23 ते 29 नोव्हेंबर दरम्यान ऊर्जा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध आंतरशालेय क्रीडा, साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कॉलेजमध्ये आज पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देताना व्यवस्थापक फादर रॉनी डिसोझा म्हणाले की, सेंट पॉल पदवीपूर्व कॉलेजचा वार्षिक आंतरशालेय स्तरावरील क्रीडा, साहित्यिक आणि सांस्कृतिक “ऊर्जा महोत्सव” सहा दिवस आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील 50 हून अधिक शाळा आणि 2000 हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. 11 प्रकारांमध्ये 21 हून अधिक सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत. 23 रोजी महाविद्यालयाच्या मैदानात प्राचार्य फादर जेकब कर्व्हालो यांच्या स्मरणार्थ हायस्कूलच्या मुला-मुलींसाठी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रसिद्ध पत्रकार लुईस रॉड्रिग्स यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 24 रोजी सकाळी 10:30 वाजता बेळगाव जेएनएमसीचे उपप्राचार्य डॉ. राजेश पवार यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. प्रसिध्द वक्त्या डॉ. छाया मेहता यांच्या स्मरणार्थ निबंध, प्रश्नमंजुषा व भाषण स्पर्धा 25 व 26 रोजी होणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी फॅशन शो, कॉमेडी शो, नृत्य, गायन आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच 28 रोजी होणाऱ्या समारोप समारंभात विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला फादर स्टीव्हन अल्मेडा, प्राचार्य पद्मिनी रवींद्रन उपस्थित होते.

Tags: