तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे मार्शल आर्टस् चॅम्पिअनशिप-2022 मध्ये विजयनगर हिंडलगा येथील ध्रुव महेंद्र पाटील याने चमकदार कामगिरी केली आहे.
अकादमी ऑफ ओकिनावा मार्शल आर्टस् इंटरनॅशनल मान्यताप्राप्त मास्टर केशव कराटे अकॅडेमी इंडियाने हैदराबादमधील युसूफगुडा येथील कोटला विजयभास्कर रेड्डी इनडोअर स्टेडिअममध्ये दुसऱ्या आंतरराष्ट्रीय मार्शल आर्टस् चॅम्पिअनशिप-2022 चे आयोजन नुकतेच केले होते. त्यामध्ये भारतासह श्रीलंका, जपान, अमेरिका आदी देशातील कराटेपटूंनी भाग घेतला होता. या स्पर्धेत ध्रुव महेंद्र पाटील याने चमकदार कामगिरी करून कुमीते प्रकारात सुवर्णपदक व कटास प्रकारात कांस्य पदक मिळवले. तो वनिता विद्यालय इंग्लिश माध्यम शाळेत सातवीच्या वर्गात शिकत आहे. त्याला कराटे प्रशिक्षक भरमानी मल्लप्पा पाटील-चलवेनहट्टी यांचे प्रशिक्षण लाभत आहे.


Recent Comments