कंग्राळी खुर्द मराठी शाळेमध्ये कर्नाटक सरकार , जिल्हा.पंचायत बेळगाव,समग्र शिक्षण कर्नाटक शाळा,शिक्षण आणि साक्षरता विभाग , बेळगाव दक्षिण क्षेत्रशिक्षणाधिकारी आणि क्षेत्र समन्वयाधिकारी कार्यालय आणि विभाग बेळगाव यांच्या विद्यमाने दिव्यांग मुलांचे मोफत वैद्यकिय तपासणी शिबिर शुक्रवार दि.१८/११/२२ रोजी पार पडले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा.पं.अध्यक्ष यल्लाप्पा पाटील मुख्य आथीती म्हणून डायटचे प्रिन्सिपल आर.पि जुठ्ठण्णवर,क्षेत्रशिक्षणाधिकारी डा.एम.एस.मेदार, डा.जि.के.हिरेमठ मनोविकास संस्था हूबळी,डा.ब्रिजेश शुक्ला अलांको सस्था बेंगळुर,डा.मोहन हाड व सांधे तज्ञ,एच.बी.मुल्लानट्टी जि.यो.उपसमन्वयाधिकारी, sdmc अध्यक्ष मनोहर पाटील,sdmc उपाध्यक्षा मयूरी मारीहाळकर ,एच .बी.कोलकार, .एस.एल.बंडकण्णवर क.रा.शा.शि.सं.बेळगाव ग्रामिण व मान्यवर होते.दिव्यांग विद्यार्थिनिसह मुख्य अतिथी व मान्यवरांकडुन सरस्वती फोटो व दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाला चालना देण्यात आले.

नंतर डायट प्रिन्सिपल श्री जुटण्णवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नंतर बुद्धीमांध्य व मानसिक रोग,दृष्टी दोष,हाड व सांधे,कान,तोंड व घसा आणि शारिरिक कमतरता अशा शेकडो विद्यार्थी बालकांचे पाच विभाग करुन अनुभवी तज्ञांमार्फत तपासणी करुन त्यावर उपाय व मार्गदर्शन करुन येत्या काळात किट्सही देण्यात येणार असल्याचेही सांगितले.तर यावेळी शिबिरासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना बस खर्च तर पालक व मुलांना भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली होती. बेळगाव ग्रामीण वलयातुन एकुन चारशे मूलं आली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्षेत्रशिक्षणाधिकारी डा.एम.एस.मेदार यांनी केले .


Recent Comments