Belagavi

मी भाजप सोडणार नाही : माजी मंत्री रमेश जारकीहोळी

Share

मी कोणत्याही कारणास्तव जेडीएसमध्ये सामील होणार नाही.मी भाजप सोडणार नाही असे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले आहे.

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बेळगुंदी जवळ रमेश जारकीहोळी यांचे जवळचे मित्र नागेश मन्नोळकर यांच्या मालकीच्या स्मार्ट काजू कारखान्याचे उद्घाटन करण्याआधी रमेश जारकीहोळी यांनी माध्यमांशी संवाद साधला, मी काँग्रेसमध्ये मंत्री होतो. आम्ही ते मंत्रिपद सोडून भाजपमध्ये जाऊन सरकार स्थापन केले.आता मला मंत्री करण्यासाठी मी कोणाकडेही गेलो नाही.मंत्रिपदासाठी मी दिल्लीला गेल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये येत आहे. रमेश जारकीहोळी म्हणाले की 2023 मध्ये भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी प्रामाणिकपणे काम करू.

1994 मध्ये देवेगौडा यांनी मला जनता दलात येण्याचे निमंत्रण दिले, पण त्यावेळी मी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ होतो, काँग्रेस पक्षाने माझी फसवणूक केली नाही, मात्र नेत्यांच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून मी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या पक्षात आता भाजप पक्षाचा निष्ठावंत म्हणून पक्षाची सेवा करेन.

तुम्हाला अद्याप मंत्री करण्यात आलेले नाही, या माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, “भाजपचे नेते माझ्या संयमाची परीक्षा घेत असतील, पण 2023 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्ष मला महत्त्वाची जबाबदारी देईल. रमेश जारकीहोळी म्हणाले की, मी मंत्री झालो किंवा नाही झालो तरी भाजपला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे.

Tags: