Belagavi

बेळगावात अखिल भारतीय सहकार सप्ताह सुरू : मंत्र्यांची अनुपस्थिती..!

Share

औषध, शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा यासह इतर क्षेत्रात सहकार क्षेत्राचा अवलंब करण्याचे आवाहन राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी केले.

बेळगावातील ऑटोनगर येथील कर्नाटक राज्य सहकारी नागरी बँक महामंडळाच्या प्रांत कार्यालयाच्या के. एच. पाटील सभागृहात बुधवारी अखिल भारतीय सहकार सप्ताह-2022च्या उदघाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सहकार मंत्री एस. टी. सोमशेखर, जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ अनुपस्थित होते. मंचावरील मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

या कार्यक्रमात सहभागी होऊन बोलताना राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी म्हणाले, सहकारातील कर्मचारी, व्यवस्थापन आणि सभासद यांचे संबंध परस्पर पूरक असतील तरच सहकार क्षेत्र टिकू शकेल. सहकार क्षेत्रात प्रारंभिक टप्प्यातील संस्थांची प्रगती कशी झाली यावर चर्चा करणे आवश्यक आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी अनेक सहकारी संस्था जतन करून वाढवण्याकडे विशेष लक्ष द्यावे, असे ते म्हणाले.

कार्यक्रमात खासदार मंगल अंगडी, बेळगाव डीसीसी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती, आमदार प्रकाश हुक्केरी, उत्तरचे आमदार अनिल बेनके, कर्नाटक राज्य मद्य नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन तुबाकी, बी. टी. पाटील, जगदीश कवटगीमठ, बी. एस. परमशिवय्या, बापूगौडा पाटील, बसवराज सुलतानपुरे आदी मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.

Tags:

akhil-bharat-sahakar-saptah-inaugurated-in-belagavi/