Belagavi

बेनकनहळ्ळीत आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते रस्ताकामाला चालना

Share

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील रस्त्यांच्या विकासासाठी ४५ लाख रुपये मंजूर झाले असून महालक्ष्मी नगर, बेनकनहळ्ळी येथे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्थानिक रहिवाशांच्या उपस्थितीत भूमिपूजन करून रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला.

रस्त्यांच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले की, बेळगावच्या ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासावर अधिक भर देण्यात आला असून बहुतांश रस्त्यांची सुधारणा करण्यात आली आहे. पुढील विकासासाठी जनतेचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी स्थानिक रहिवासी चंद्रशेखर शेळके, मडिवाळप्पा, मोहन गडाद, संभाजी खोत, चौगुले, मोहन सांब्रेकर, सौ. हुक्केरी तसेच स्थानिक रहिवासी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags:

laxmi hebbalkar drive for road work at benakanahalli