Belagavi

लिंपी रोगावर औषधाचा तुटवडा होणार नाही याची काळजी घ्या : नेगीलयोगी रयत संघ

Share

बेळगाव जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी आणि जनावरांना होणाऱ्या त्वचेच्या गाठींच्या लिंपी आजारावर औषधांचा तुटवडा भासू नये यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी नेगीलयोगी रयत सेवा संघाने केली आहे.

बेळगाव येथील पशुवैद्यकीय विभाग कार्यालयाला नेगीलयोगी रयत सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी भेट देऊन विभागाचे उपसंचालक डॉ. राजीव कुळेद यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी बोलतांना नेगीलयोगी रयत सेवा संघाचे राज्याध्यक्ष रवी पाटील म्हणाले, गेल्या सोमवारपर्यंत औषधे पोहोचतील आणि जिल्ह्याच्या सर्व भागात पूर्णत: पुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिले होते. अनेक मठाधीश आणि स्वामीजी औषध पुरवठा करत आहेत. सरकारच्या वतीने तुम्ही काय करत आहात असा सवाल केला. गो संपत्तीचे संरक्षण आमची जबाबदारी आहे, असे बॅनर सरकार लावते. मात्र समस्या सोडवण्यासाठी कोणतेही काम होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

व्हॉइस यावर बोलताना विभागाचे उपसंचालक डॉ. राजीव कुळेद यांनी, जिल्हा पालक मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कित्तूर तालुक्यासाठी 6, रामदुर्गासाठी 7, खानापूरसाठी 5 अशा एकूण 17 अधिकारी व कर्मचाऱ्यांची त्वचारोग नियंत्रणासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. लसीकरण पूर्ण प्रमाणात केले जात आहे. लिंपी हा एक संसर्गजन्य त्वचारोग आहे ज्यासाठी कोणतेही विशिष्ट उपचार नाहीत. प्रतिबंधक उपाय म्हणून आम्ही सर्व गुरांना 100% लसीकरण करत आहोत, असे समजावून सांगितले.

यावेळी नेगीलयोगी रयत सेवा संघाचे पदाधिकारी इराप्पा माकगौडर, गंगय्या पुजार आणि अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Tags:

negilayogi-raitha-seva-sangh-urging-for-more-medicine-for-lumpy-disease/