Belagavi

सह्याद्रीनगरच्या सारथी कॉलनीत मोफत आरोग्य शिबीर

Share

आरोग्य संस्थांनी मोठ्या प्रमाणात आरोग्यविषयक शिबिरे आयोजित करून अर्थपूर्ण व आवश्यक समाजसेवा करावी असे आवाहन बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.

सह्याद्रीनगरजवळील सारथी कॉलनीत आज मंगळवारी सहारा फाऊंडेशन आणि डॉ. देवेगौडा यांच्या श्री ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत हाड तपासणी व सामान्य आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन केल्यावर आमदार लक्ष्मी हेब्बाळकर बोलत होत्या.

अशा प्रकारची आरोग्य शिबिरे घेतल्यास लोकांमध्ये आरोग्याबाबत जागरुकता निर्माण होऊन त्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी श्री ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटरचे संचालक डॉ. देवेगौडा, सहारा फाउंडेशनचे सलमान, सारथीनगर रहिवाशी संघाचे अध्यक्ष बी. आर. धबाले, संगीता तंगडी, रुद्रय्या हिरेमठ, मुश्ताक मुल्ला यांच्यासह स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

Tags: