Belagavi

बापट गल्ली भजनी मंडळाच्या काकडारतीची सांगता

Share

बेळगावातील बापट गल्ली येथील सांप्रदायिक भजनी मंडळातर्फे आयोजित काकडारती उपक्रमाची आज भक्तिमय वातावरणात सांगता झाली. यानिमित्त भजन-कीर्तन, हाजगोळी येथील बाल वारकऱ्यांचे भजन, दहीकाला आणि आवळीभोजन आदी कार्यक्रम पार पडले.
व्हॉईस : होय, कार पार्किंग बापट गल्ली येथील विठल-रखुमाई मंदिरात आज, रविवारी सांप्रदायिक भजनी मंडळातर्फे आयोजित काकडारती सोहळ्याची आज सांगता झाली. या सोहळ्याचे यंदाचे हे सलग ३५ वे वर्ष. कोजागिरी पौर्णिमेपासून सुरु असलेल्या या काकडारती सोहळ्याच्या सांगता समारंभात आज महाराष्ट्र सीमेवरील हाजगोळी गावातील बाल वारकऱ्यांच्या चमूने टाळ-मृदंगाच्या साथीने हरिपाठ सादर केला. तत्पूर्वी मंदिरात विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तींना अभोषेक घालून काकडारती म्हणण्यात आली. हरिपाठानंतर दहीकाला उत्सव पार पडला. त्यानंतर विठ्ठल-रखुमाईची पालखी प्रदक्षिणा सोहळा पार पडला. ऍड. अशोक पोतदार, मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत सांबरेकर आणि प्रभाकर कणबर्गी यांच्याहस्ते पालखी पूजन करण्यात आले. त्यानंतर बापट गल्ली विठ्ठल-रखुमाई मंदिरापासून खडेबाजार, रामदेव गल्लीमार्गे पुन्हा बापट गल्ली मंदिर या मार्गावर ही पालखी मिरवणूक निघाली.


दरम्यान, या उत्सवाबाबत माहिती देताना ज्येष्ठ वकील अशोक पोतदार म्हणाले, अनेक वर्षांपूर्वी हा भाग मागास होता. आता बरीच सुधारणा झाली आहे. परंतु येथील विठ्ठल मंदिरात अनेक वर्षांपासून कार्तिक मासात काकडारती सोहळ्याचे आयोजन केले जाते. बापट गल्ली व परिसरातील अनेक भाविक, महिला व मुले या सोहळ्यात भक्तिभावाने सहभागी होतात. विठ्ठल भक्तीची ही परंपरा अशीच सुरु राहो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
अन्य एक ज्येष्ठ वारकऱ्यांनी सांगितले की, या ठिकाणी ३५ हुन अधिक वर्षांपासून कार्तिक मासात काकडारती सोहळ्याचे आयोजन केले जाते. यात या परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. दररोज सकाळी महिला व मुले घरातून आरती, प्रसाद घेऊन येतात. सर्वांच्या सहभागाने हा सोहळा यशस्वी केला जातो. यासाठी महिलावर्गाचे मोठे योगदान लाभते असे त्यांनी सांगितले.
या सोहळ्यानंतर आवळी भोजनाचा प्रसाद वाटप सोहळा कॅम्प येथील श्री दत्त मंदिरात पार पडला. यावेळी विणेकरी कामटे, पुणेकर, गणपत चौगुले, दिलीप पोटे, पांडुरंग पाटील, उदय पाटील, राजू पवार, शिवराम गवाणे, महेश पावले, रोहन मिसाळ, राम जाधव, विक्रम चौगुले, मारुती केसरकर, मधु कणबरकर, काकडआरती महिला विभाग अध्यक्षा माया कोरे, सचिव प्रभावती सांबरेकर, लता पाटील, मिलन गवाणे, दीप पोटे, सुवर्णा कणबरकर, सौ. मिसाळ, सौ. मुचंडी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत सांबरेकर यांनी केले.

Tags:

bapat galli belgaum kakadi arati in vitthal rakhumai mandir