Belagavi

बेळगाव एसपींच्या फोन-इन कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद

Share

बेळगाव जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच पोलिस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आज घेतलेल्या फोन-इन कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला.

जिल्ह्यातील जनतेला आपापल्या हद्दीतील गुन्हेगारीविषयक समस्या थेट एसपींकडे मांडून त्यांची सोडवणुक करून घेता यावी या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी आज फोन-इन कार्यक्रम घेतला. त्यात जिल्ह्याच्या विविध भागातून नागरिकांनी फोन करून आपल्या समस्या मांडल्या. प्रथमच घेतलेल्या या फोन-इन कार्यक्रमात प्रामुख्याने अवैध दारूविक्री व मटक्याबाबत तक्रारी करण्यात आल्या. जिल्ह्यात ठिकठिकाणी अवैध दारूविक्री व मटक्याचा त्रास वाढला असून त्याला तरुण पिढी बळी पडत असल्याने त्यावर आळा घालण्याची मागणी जनतेने केली.

याला सकारात्मक प्रतिसाद देत तुमचे प्रश्न लवकर सोडवण्यात येतील असे एसपी डॉ. संजीव पाटील यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे सरकारी शाळांच्या आवारात तंबाखूसह अमली पदार्थांची विक्री होत आहे. याला आळा घालण्याची मागणीही नागरिकांनी केली. याला उत्तर देताना एसपींनी तात्काळ सांगितले की, जिल्ह्यातील शाळांच्या आवारात दारू आणि अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यास संबंधितांवर तत्काळ छापा टाकून कडक कारवाई करण्यात येईल.

Tags:

good-response-for-sp-phone-in-program/